Farhan Akhtar On Bollywood : बॉलीवूडमधील काही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास अयशस्वी ठरत आहेत. बॉलिवूड चित्रपटांच्या कथेला प्रेक्षकांची पसंती मिळत नाहीये. त्यामुळे बिग बजेट असो की छोटे बजेट, बॉलिवूड चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकत नाहीये. आता बॉलीवूडला कंबर कसावी लागणार आहे कारण हिंदी चित्रपटांना सोडून बाकी सर्व भाषेमधील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) बॉलिवूड चित्रपटांबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. फरहाननं मिस मार्वल (Ms. Marvel) या सिरीजमध्ये काम केलं आहे. या सीरिजमधील फरहानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  


फरहान अख्तरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'मिस मार्वलमध्ये काम करण्याचा अनुभव हा अद्भुत होता.  लोक सुपरहिरो चित्रपटांचा आनंद घेतात,परंतु हिंदी चित्रपटातील नायक बरेच दिवस सुपरहिरो जे करतात तेच करत आहेत. आपले हिरो हे लोकांना मारतात आणि त्यांना हवेमध्ये उडवतात. '


पुढे फरहान म्हणाला, 'बॉलिवूडनं काही गेल्या काही दिवसांमध्ये हिट चित्रपट दिले पण त्यांना सुपर हिरो आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर  सामना करावा लागतो. हॉलिवूडच्या कंटेन्टसोबत स्पर्धा करण्यासाठी हिंदी चित्रपटांकडे मोठे बजेट नाहीये, पण बॉलिवूडला आता कंबर कसावी लागेल.'. 'दिल चाहता है', 'लक्ष्य' आणि 'डॉन' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये फरहाननं काम केलं आहे.


19 फेब्रुवारी रोजी फरहाननं शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली. फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट  घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.


हेही वाचा: