एक्स्प्लोर

Prem Pratha Dhumshaan: गावपळणीची अनोखी प्रथा अन् थरारक प्रेमकथा; शिवाली परबच्या ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Prem Pratha Dhumshaan : सिंधुदुर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Prem Pratha Dhumshaan : सिंधुदुर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ (Prem Pratha Dhumshaan) या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार असून,  4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावांमध्ये गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठराविक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वंदता आहेत. मात्र, आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट तयार झाला आहे.

पाहा ट्रेलर :

मात्र, या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा असं सारं काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. गावपळण या प्रथेविषयीच सगळ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. त्यामुळेच अस्सल मालवणी भाषेतला, लोकसंस्कृतीवर आधारित ‘प्रेम प्रथा धुमशान’ नक्कीच बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमशान घालणार यात शंका नाही.

मालवणी भाषेतील गाणीही चर्चेत!

ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेम प्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातलं ‘धुमशान घाला रे’ हे मालवणी गाणं सध्या सगळीकडे वाजत आहे.

‘धुमशान घाला रे’ (Dhumshaan Ghala Re) हे मालवणी बोली भाषेतील गाणं आहे. धमाल शब्द आणि ताल धरायला लावणारं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मालवणी गाणी फारच मोजकी असल्यानं या नव्या धमाल गाण्याची आता त्यात भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका अत्यंत वेगळ्या प्रथेवर या चित्रपटातील कथा बेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच चर्चा आहे. मात्र, आता ‘धुमशान घाला रे’ हे गाणं मालवणी माणसांसह समस्त चित्रपटप्रेमींना ताल धरायला लावणारं आहे.

हेही वाचा :

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब झळकणार 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमात; टीझर आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget