Shiv Thakare : आपला माणूस शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काहीतरी हटके करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आता त्याच्या घरी गणरायाचं (Ganesh Chaturthi 2023) आगमन झालं आहे. शिवच्या घरी वर्दीतल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या हस्ते बाप्पाचं दणक्यात आगमन करण्यात आलं आहे.


शिव ठाकरेने गणपती (Ganapati Bappa) बाप्पाचं स्वागत केलं आहे. आपल्या माणसाचा गणपती खूपच खास आहे. शिवने पोलिसांचा गणवेश परिधान करून गणपती बाप्पा घरी आणला आहे. एका कृतीतून त्याने रात्रंदिवस सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिसांना मानवंदना दिली आहे. शिव ठाकरेचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.






शिवचे बाप्पासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. आपल्या माणसाने यंदाची थीम 'पोलीस' अशी ठेवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस थीम असलेल्या बाप्पाचं शिव धूमधडाक्यात स्वागत करताना दिसत आहे. या बाप्पाच्या आगमना दरम्यान 50 पोलिसही सहभागे झाले होते. जल्लोष करत त्यांनी बाप्पाचं स्वागत केलं आहे.


बाप्पा माझा एनर्जी सोर्स : शिव ठाकरे


शिव ठाकरेसाठी यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) खूप खास आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बाप्पाबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला होता,बाप्पा हा माझा एनर्जी सोर्स आहे. तसेच त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट करत नाही. बाप्पावर माझा खूप विश्वास आहे. आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. पण ते दहा दिवसही कमी पडतात". 


शिव ठाकरे पुढे म्हणाला,"बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. बाप्पा आले की दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच उत्साह असतो. आरत्या, मोदक, दुर्वा या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा आहे. आमच्या बाप्पाची मूर्ती मी निवडतो. मूर्ती निवडताना बाप्पाच्या डोळ्यांकडे माझं लक्ष असतं. हवी असलेली मूर्ती शोधण्यासाठी दोन-दोन दिवस मी फिरतो". शिव ठाकरेच्या बाप्पाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


संबंधित बातम्या


Shiv Thakare : गणपती बाप्पा मोरया! शिवचा एनर्जी सोर्स आहे बाप्पा; म्हणाला,"गणरायाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही"