Shiv Thakare On Daisy Shah : मिस्टर फैसू (Mr Faisu) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फैसल शेखने (Faisal Shaikh) नुकताच एक टॉक शो सुरू केला आहे. 'खतरों के खिलाडी 12' आणि 'झलक दिखला जा 10'च्या माध्यमातून फैसू चांगलाच लोकप्रिय झाला. आता त्याच्या नव्या टॉक शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान या टॉकशोमध्ये शिव ठाकरेने (Shiv Thakare) डेझी शाहसोबतच्या (Daisy Shah) रिलेशनवर भाष्य केलं आहे.


डेझीशाहसोबतच्या रिलेशनबद्दल बोलताना शिव ठाकरे (Shiv Thakare On Daisy Shah) म्हणाला,"शिव ठाकरेची प्रत्येक सकाळ डेझी होती". शिव ठाकरे यावर प्रतिक्रिया देत म्हणाला,"नाही असं काही नाही आहे...ना रात्र होते, ना दुपार ना सकाळ". डिनोसोबत माझी चांगली मैत्री आहे. पण आजकाल लोकांना 'ब्रदर' (Brother) सिनेमा आवडत नाही. तर त्यांना 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा जास्त आवडतो". 


शिव ठाकरे पुढे म्हणाला,"काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी मला, शिझान खान आणि डेझीला  बोलावणं आलं होतं. पण काही कारणाने शिझानला उपस्थित राहता आलं नाही आणि मी आणि डेझी स्पॉट झालो. त्यानंतर एक रोमँटिक गाणं शेअर करत हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. मीदेखील एक प्रेक्षक असतो तर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिलेशनमध्ये असल्याची चर्चा केली असती. त्यामुळे चाहत्यांना काही बोलण्यात अर्थ नाही". 






शिव ठाकरे आणि डेझी शाह 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या दोघांची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. आफ्रिकेत या कार्यक्रमाचं शूटिंग सुरू आहे. आजवर अनेकदा शिव ठाकरे आणि डेझी शाह यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
 
डेझी शहा इंस्टेंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती,"शिव आणि माझ्यात मैत्रीचं नातं आहे. ठरवून केलेली ही मैत्री नव्हे. शिव नक्कीच माझा एक चांगला मित्र आहे. शिवची आई त्याच्यासाठी अमरावतीत एक चांगली मुलगी शोधत आहे. शिव हा खूपच साधा आहे. 36 येतील आणि 36 जातील पण शिव त्याच्यासाठी नक्कीच एक चांगली मुलगी पसंत करेल".


संबंधित बातम्या


Shiv Thakare : ताई, आता आपले दिवस आलेत, ओवाळणीला 1 रुपया देणाऱ्या शिव ठाकरेकडून बहिणीला मोठं गिफ्ट