Sunny Deol Took Dharmendra to US For Treatment : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अर्थात सनी देओल (Sunny Deol) गेल्या काही दिवसांपासून 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. पण आता वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. सनी देओलचे वडील आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची तब्येत बिघडली असून ते उपचारांसाठी अमेरिकेला (USA) रवाना झाला आहेत. सनी देओलही त्यांच्यासोबत आहे. 


धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने सनी देओलने घेतला ब्रेक


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र (Dharmendra Medical Treatment) यांची तब्येत बिघडल्याने सनी देओलने कामातून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात आहे. धर्मेंद्र यांच्या उपचारांसाठी सनी त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे. पुढील 20 दिवस तो त्यांच्यासोबत राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. धर्मेंद्र यांचं वय 87 असून अधून-मधून त्यांच्या तब्येतीत चढ-उतार येत असतात. चिंता करण्यासारखं काहीही नाही, असं सांगण्यात येत आहे. 


धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण आता काळजी करण्यासारखं काही नसल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील 15-20 दिवस अमेरिकेत धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असणार आहेत. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 


धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी मनोरंजनसृष्टीत कमबॅक केलं आहे. त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात धर्मेंद्र रणवीर सिंहच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमाला आणि धर्मेंद्र यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत उपचार करुन भारतात आल्यानंतर ते पुन्हा एकदा आगामी सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आगामी सिनेमांची उत्सुकता आहे.


दुसरीकडे, सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस धमाका करत आहे. 'गदर 2' या सिनेमाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये आलेल्या 'गदर : एक प्रेम कथा' (Gadar : Ek Prem Katha) या सिनेमाचा हा सीक्वेल आहे. या सिनेमातील तारा सिंह आणि सकीनाची जोडी, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सनी देओलसह या सिनेमात अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच सिमरत कौर आणि मनीष वाधवानेही चांगलं काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 31 दिवसांत केली 513.85 कोटींची कमाई