India vs Pakistan, KL Rahul Century पाकिस्तानविरोधात (India vs Pakistan) शतक झळकावत  केएल राहुलनं (KL Rahul) जबरदस्त कमबॅक केला आहे.  केएल राहुलच्या टीम इंडियातील निवडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच काही लोक त्याच्यावर टीका करत होते. आता या सर्व ट्रोलर्सला केएल राहुलनं त्याच्या परफॉर्मन्समधून सडेतोड उत्तर दिलं आहे. आता  केएल राहुलचा सासरा म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने नुकतेच एक ट्वीट शेअर करुन केएल राहुलच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे. 


सुनील शेट्टीचं ट्वीट


'एक जबरदस्त कामगिरी, विजय परत आला आहे.कृतज्ञता ओव्हरफ्लो, सर्व प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल देवाचे आभार.' असं ट्वीट सुनील शेट्टीनं केलं आहे. या ट्वीटमध्ये सुनीलनं केएल राहुलचा एक फोटो देखील शेअर केला आहे.






आथियानं शेअर केली खास पोस्ट


केएल राहुलची पत्नी  अथिया शेट्टीनं (Athiya Shetty)  तिच्या पतीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं केएल राहुलचे काही मॅचमधील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  काळी रात्रही संपते आणि सूर्य उगवतो…  तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस, मी तुझ्यावर प्रेम करते.'






राहुल याला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केले. राहुल याने  कालच्या समान्यात नाबाद 111 धावांची खेळी केली. केएल राहुल याने 106 चेंडूत दोन षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली. राहुलच्या या खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होतेय. 


केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला.सुनील शेट्टीच्याखंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा पार पडला. अथिया आणि केएल राहुल जवळपास 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसोहळ्यासाठी अथियानं खास लूक केला होता. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


महत्वाच्या इतर बातम्या: 


राहुलचं जबराट कमबॅक, पाकिस्तानविरोधात शतक, टीकाकारांना दिले उत्तर