TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!
शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. 


काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका!’, गायिका वैशाली माडेची धक्कादायक पोस्ट


राठी मनोरंजन विश्वातील आघाडीची गायिका वैशाली माडे-भैसने (Vaishali Made-Bhaisane) हिने नुकतीच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट लिहिली आहे. वैशालीच्या या खळबळजनक पोस्टने चाहते देखील चिंतेत पडले आहेत. वैशालीने आपल्या जीवाला धोका असल्याची पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. 


'मुझे भाई नहीं गॉड फादर बोलते है' बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज; अक्षयचा हटके लूक


बहुचर्चित चित्रपट बच्चन पांडेचा (Bachchan Pandey) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  या ट्रेलरला पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या ट्रेलरमधील अक्षय कुमारच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


'गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात', बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित


संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रमुख भूमिकेत आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आलिया भट्टने 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिले आहे,"उद्याच्या पेपरमध्ये लिहा, गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात". 


'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड


आज बहुप्रतिक्षित 'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागल्याने अनेक सिनेप्रेमींना आज सिनेमा पाहता आला नाही. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


संबंधित बातम्या


Toolsidas Junior : 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाची रिलीज डेट ठरली, Sanjay Dutt स्नूकर परीक्षकाच्या भूमिकेत


Samantha Prabhu : विमानतळावरच समंथाचा ‘Halamithi Habibo’ गाण्यावर ठेका! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!


DIDLM 5 : 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5' चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह 'ही' अभिनेत्री असणार परिक्षक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha