एक्स्प्लोर
शिल्पा शेट्टीच्या मुलाचा रणवीर स्टाईल डान्स
मुंबईः अभिनेता रणवीर सिंह त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या कोणत्याही सोहळ्याला रणवीरने हजेरी लावली आणि त्याचा डान्स चाहत्यांना पाहायला मिळाला नाही असं क्वचितच होतं. मात्र आता रणवीरला शिल्पा शेट्टीचा चार वर्षाचा मुलगा वियान हा नवा स्पर्धक मिळाला आहे.
वियानने एका कार्यक्रमात अफलातून डान्स केला. वियानच्या डान्सचा व्हिडिओ शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने ट्विटरवर शेअर केला आहे. वियान रणवीरला आव्हान करत आहे, त्याचा ताल पाहा, असं राज कुंद्राने रणवीरला टॅग करुन लिहीलं आहे.
शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान हा सध्या केवळ चार वर्षांचा आहे. वियान एका कार्यक्रमात रणवीरच्या 'ततड ततड' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे वियानची डान्स करण्याची शैली देखील रणवीर सारखीच आहे.
पाहा डान्सचा व्हिडिओः
https://twitter.com/TheRajKundra/status/761901523324592128
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement