मुंबई : महाशिवरात्रीच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या घरी नवी पाहुणी आली आहे. शिल्पाने ही गोड बातमी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत चाहत्यांना दिली आहे. शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा आई झाली असून तिच्य घरी एक गोंडस मुलगी आली आहे. शिल्पाने पोस्ट करत सांगितलं की, 'तिच्या घरी लक्षमीचा जन्म झाला आहे आणि त्यासाठी मी देवाचे आभार मानते.'


शिल्पा शेट्टीने एक फोटो शेअर करत सांगितलं की, तिच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे. एवढचं नाहीतर शिल्पाने आपल्या मुलीचं नामकरणंही केलं आहे. शिल्पा आपल्या मुलीला ज्युनियर एसएसके म्हणून संबोधलं आहे.'





शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आमच्या प्रार्थनेला आज या चमत्काराने उत्तर मिळालं आहे. आम्ही मनापासून ईश्वराचे आभार मानतो. आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या घरी एका छोटीशी परी आली आहे.' तिचं नाव समीशा शेट्टी कुंद्रा आहे. समीशाचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आहे.'


शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर फराह खानने कमेंट केली आहे. याबाबत बोलताना फराह खान म्हणाली की, 'थँक्यू गॉड, आता मी हे सीक्रेट जास्त दिवस ठेवू शकत नाही, bless bless & bless.' फराहच्या कमेंटवरून हे सिद्ध होत आहे की, शिल्पाच्या या गोष्टीबाबत फराह खानला आधीपासूनच माहिती होती. शिल्पाला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पासाठी हा दिवस अत्यंत खास आहे.


दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्रासोबत 22 नंवबर 2009 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनी पुन्हा आई बनली आहे. या दोघांनाही एक मुलगा असून 2012मध्ये त्याचा जन्म झाला होता. आता त्यांच्या घरी एक छोटीशी परी आली आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा सरोगसीद्वारे आई-वडील बनले आहेत. शिल्पाच्या कामाबाबत बोलायचे झालं तर, शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. ती सब्बीर खानच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे.


संबंधित बातम्या : 


65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी

'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार


रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज


First Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज

'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज