Scenes From Patriotic Movies : आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन हा खास आहे कारण आपण स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात. जाणून घेऊयात देशभक्तीपर चित्रपटांमधील सीन्सबाबत...
शेरशाह
शेरशाह या चित्रपटामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं साकारली आहे. या चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बलिदानाचा सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं. सीनमध्ये पाकिस्तानी सैनिक जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर गोळ्या झाडतात तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात.
'चक दे इंडिया' मधील हॉकी टीमचा विजय
अभिनेता शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये शाहरुखनं हॉकी टीमच्या कोचची भूमिका साकारली आहे. 'चक दे इंडिया' चित्रपटामधील भारतीय हॉकी टीमच्या विजयाच्या सीन पाहिल्यानंतर प्रेक्षक भावूक होतात. हॉकीच्या मैदानात चित्रपटामधील मुलींच्या टीमनं केलेली ही कामगिरी पाहून अनेक जण थक्क होतात.
'रंग दे बसंती' मधील कँडल मार्च
'रंग दे बसंती' चित्रपटात अभिनेता आर माधवनची भूमिका अवघ्या 9 मिनिटांची होती. त्यानं या चित्रपटात फ्लाइट लेफ्टनंट अजय सिंह राठोड ही भूमिका साकरली होती. विमान अपघातात अजय सिंह राठोड हे शहिद होतात. त्यानंतर त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य हे इंडिया गेटवर कँडल मार्च करतात. या सीनमध्ये अजय सिंह राठोड यांची आई हातात अजय यांचा फोटो घेऊन चालत असतात.
'दंगल' मधील गीता फोगाटचा विजय
दंगल चित्रपटामध्ये आमिर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारली आहे. कुस्तीपटू गीता फोगट जेव्हा कॉमनवेल्थ गेम्सची फायनल मॅच खेळत असते तेव्हा महावीर सिंह फोगट यांना ती मॅच पाहता येत नाही. कारण त्यांना एका खोलीमध्ये बंद केलं असतं. पण नंतर जेव्हा महावीर सिंह फोगट त्या खोलीतून बाहेर येतात. तेव्हा ते गीता फोगटचा विजय पाहतात. हा सीन पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: