एक्स्प्लोर
VIDEO: 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर रिलीज, अशोक सराफ प्रमुख भूमिकेत

मुंबई: पोश्टर बॉईज, पोश्टर गर्ल यासारख्या धमकेदार सिनेमांनंतर आता दिग्दर्शक समीर पाटील यांचा नवा सिनेमा 'शेंटिमेंटल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. अशोक सराफ हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहेत. पोश्टर बॉईज आणि पोश्टर गर्ल या सिनेमातून समीर पाटील यांनी खास आपल्या शैलीत सामजिक विषयावर भाष्य केलं होतं. त्यामुळे शेंटिमेंटल हा सिनेमा नेमका कोणत्या विषयावर बेतलेला असणार याबाबत प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे. 'करप्ट अधिकारी आणि अट्टल गुन्हेगार मी एका नजरेत ओळखतो.' अशी संवाद फेक करणारे अशोक सराफ हे या सिनेमात एका पोलीस हवालदाराची भूमिका साकारत आहेत. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आणि पोस्टरही लाँच करण्यात आलं होतं. 28 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पाहा 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















