Shekhar Suman on Politics : अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. 'हीरामंडी' (Heeramandi) फेम अभिनेत्याला याआधी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेसकडून तिकीट मिळालं होतं. त्यावेळी भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हाने त्यांना हरवलं. त्यानंतर तीन वर्षांनी शेखर काँग्रेसमधून बाहेर पडला. दुसरीकडे या महिन्याच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याने भाजपात प्रवेश केला. पूर्णपणे अभिनयक्षेत्र सोडून राजकीय प्रवास सुरू करण्याचा अभिनेत्याचा काही विचार नव्हता. अशातच आता शेखरच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 


राजकारणाासाठी अभिनय सोडणार नाही (Shekhar Suman on BJP) 


न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन म्हणाला,"आजही एक उत्कृष्ट अभिनेता होण्याची माझी इच्छा आहे. हा राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत राहुनही मला राज्यासाठी काम करता येईल. राजकारणातील चढ-उतारांमध्ये मला अडकायचं नाही. माझी राजनैतिक महत्त्वकांक्षाही नाही. मी कोणी राजकारणी नाही. राजकारणात येऊन काही गोष्टी करायच्या आहेत". 


"...तर BJP सोडेल" : शेखर सुमन


शेखर पुढे म्हणाला,"मी सक्षम आहे. मी ध्येय ठरवले आहे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठीचा वेळही मी ठरवला आहे. ठरवलेल्या वेळात जर मला ध्येय पूर्ण करता आलं नाही तर मी यासगळ्यातून बाहेर पडले. सेवा करण्याच्या खास कारणाने मी इथे आलो आहे. सेवा करण्यात जर मी असमर्थ झालो तर इथे थांबण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही जर सकारात्मक असाल तर देवही तुम्हाला मदत करतो. मला वाटतं भाजप काही वर्षांपासून खूप चांगले काम करत आहे".


शेखर सुमनने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक


शेखर सुमनने प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं आहे. अभिनेता म्हणाला,"एका व्यक्तीने अनेक गोष्टी सरळ केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीय परदेशात जातो तेव्हा त्याला भारतीय असण्याचा अभिमान वाटतो. देशात विकास होत आहे. या सगळ्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आहेत".  


'हीरामंडी' या वेबसीरिजच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शेखर सुमनने बीजेपीमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. अभिनेत्याचा मुंबईत आलिशान बंगला आहे. अभिनेत्याची एकूण संपत्ती 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 


संबंधित बातम्या


Celebs Networth Who Joined Politics : कंगना रणौत, अनुपमा ते शेखर सुमनपर्यंत; राजकारणात नशीब आजमावणाऱ्या स्टार्समध्ये सर्वात श्रीमंत कोण?