Ajay Devgn Singham Again Update : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) सध्या 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2024 च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांमध्ये या सिनेमाचा समावेश आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. चित्रपटाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. अशातच आता या चित्रपटासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटात एका दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. 


'सिंघम अगेन'मध्ये तेलुगू स्टार अजयची एन्ट्री!


अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट काही दिवसांपासून चांगालाच चर्चेत आहे. या चित्रपटासंदर्भात आलेली लेटेस्ट अपडेट जाणून घेतल्यानंतर चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता दुप्पट झाली आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यात अजय देवगन तेलुगू स्टार अजयसोबत दिसून येत आहे. या फोटोवरुन असं स्पष्ट होत आहे की 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगनची एन्ट्री झाली आहे. तेलुगू स्टार चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तेलुगू स्टार अजय 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 


'सिंघम अगेन'मध्ये जॅकी श्रॉफमध्ये झळकणार


'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे. या चित्रपटाचं शूटिंग जम्मू काश्मीरमध्ये होत आहे. शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अजय देवगन आणि जॅकी श्रॉफ यांचा फाइट सीन शूट होताना दिसत आहे. सेटवर लीक झालेल्या गोष्टीवर जॅकी श्रॉफ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगन (Ajay Devgn), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), करीना कपूर (Kareena Kapoor), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे कलाकार झळकणार आहेत. तसेच अक्षय कुमार (AKshay Kumar) आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh) झलक पाहायला मिळणार आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटात या चित्रपटासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


OTT : ना जीतू भैय्या, ना मुन्ना भैय्या... 'हा' आहे ओटीटीवरचा सर्वात महागडा अभिनेता, एका एपिसोडचे घेतो 18 कोटी रुपये; ओळखलं का?