Shehnaaz Gill dance irks Asim Riaz : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'बिग बॉस 13' नंतर सतत चर्चेत असलेली शहनाज गिल पुन्हा एकदा सिध्दार्थ शुक्लामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांआधी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. आणि त्यावेळी जी एकमेव व्यक्ती चर्चेत होती ती म्हणजे शहनाज गिल. या सगळ्यातून आता शहनाज कुठेतरी सावरत आहे. ती नुकतीच एका कार्यक्रमात गेली होती. या कार्यक्रमातला तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे आणि त्याचसोबत सिध्दार्थच्या खास मित्रानेदेखील तिला ट्रोल केले आहे. 


शहनाजने तिच्या जवळच्या व्यक्तीच्या साखरपुड्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शहनाज सैराट या मराठी गाण्यावर थिरकली. शहनाजचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. शहनाजच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आसिम रियाझनेदेखील कमेंट केली आहे.






आसिम रियाझ म्हणाला,"लोक किती पटकन आपल्या लोकांना विसरतात आणि पुढे जातात. क्या बात! क्या बात!". आसिम आणि सिद्धार्थ हे 'बिग बॉस 13' मध्ये एकमेकांना भेटले होते. बिग बॉसच्या बाहेरच्या जगातही सिद्धार्थ आणि आसिमची मैत्री घट्ट झाली होती. ज्यादिवशी अभिनेता सिद्धार्थचं निधन झालं त्यावेळी पूर्णवेळ आसिम हा रुग्णालयात होता. यावरूनच त्यांची मैत्री किती घट्ट होती हे चाहत्यांना दिसलं. आणि कदाचित स्वत: आसिम सिद्धार्थच्या दुखातून बाहेर आला नसेल म्हणून त्याने अशी कमेंट केली असावी.


संबंधित बातम्या


Viral Video : वाढदिवस सलमानचा... भन्नाट डान्स जेनेलियाचा; व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिलाय का?


Cinemas In Delhi : उद्योगांप्रमाणेच सिनेमागृहे 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी; मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी


83 Box Office Collection : '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली कोटींची कमाई, चार दिवसांत कमावले 54.29 कोटी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha