Ranvir Shorey son Covid Positive : अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचा (Konkona Sensharma) मुलगा रणवीर शौरीला (Ranvir Shorey) कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात कोरोनाच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. रणवीरने ट्विटरद्वारे मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
रणवीरने ट्विट करत लिहिले आहे, मी आणि माझा मुलगा हारून सुट्टीसाठी गोव्याला गेलो होतो. गोव्याहून परतत असताना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात हारूनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या आम्ही क्वारंटाईनमध्ये आहोत.
हारून आहे रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्माचा मुलगा
रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर हारूनचा जन्म झाला. 2015 मध्ये रणवीर आणि कोंकणा सेन शर्मा वेगळे झाले. पण मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली. आजदेखील दोघे मुलासोबत वेळ घालवत असतात. रणवीर शौरीनं जिस्म, लक्ष्य, प्यार के साइड इफेक्ट्स, खोसला का घोसला, सिंह इज किंग, चांदनी चौक टू चाइना आणि एक था टायगर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
संबंधित बातम्या
Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' शोमध्ये RRR चित्रपटाचा धमाका; जाणून घ्या आरआरआरचा अर्थ
January 2022 Films Calender : नवीन वर्षाची सुरुवात फिल्मी, वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे होणार प्रदर्शित
Jersey Movie Posponed : 'जर्सी' सिनेमाला कोरोनाचा फटका; रिलीज डेट ढकलली पुढे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha