Shatrughan Sinha Birthday :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचा आज 76 वा वाढदिवस. शत्रुघ्न यांचा जन्म 9 डिसेंबर 1945 मध्ये पटना येथे झाला. 'जली को आग कहते हैं, बुझी को खाक कहते हैं....', 'श्याम आए तो कहना छेनू आया था'...., 'खामोश...' या शत्रुघ्न सिन्हा यांच्या डायलॉग्सला त्यांच्या चाहत्यांची आजही पसंती मिळते.


1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्यार ही प्यार' या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1980 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम चांदीरमानी यांच्यासोबत लग्नगाठ बंधली. जाणून घेऊयात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम चांदीरमानी यांच्या लव्ह-स्टोरीबाबत...


ट्रेनमध्ये केले होते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रपोज 
एकदा  शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम चांदीरमानी यांची भेट ट्रेनमध्ये झाली. त्यावेळी कागदाच्या एका तुकड्यावर पाकीजा चित्रपटातील 'अपने पैर जमीन पर मत रखिएगा' हा डायलॉग लिहीला आणि तो कागद  पूनम यांना देऊन त्यांनी प्रपोज केले. 




मेरे अपने, 'दोस्त और दुश्मन', रिवाज, बॉम्बे टू गोवा, शरीफ बदमाश, प्यार का रिश्ता, आ गले लग जा, दोस्त, कालीचरण, मुकाबला, काला पत्थर, शान, ज्वालामुखी, दो उस्ताद, तकदीर, इल्जाम, खुदगर्ज, साया, आखिरी बाजी, ताकत आणि रक्त चरित्र यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी काम केले आहे.      


संबंधित बातम्या


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...


Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?