Ankit Mohan - Ruchi Savarn : रुची सवर्ण आणि अंकित मोहनवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकतेच त्यांच्या घरी  तान्हुल्याचं आगमन झालं आहे. छोट्या पडद्यावरील हे कलाकार आज एका बाळाचे पालक झाले आहेत. 'नागिन 3', 'महाभारत' अशा दर्जेदार शोमध्ये काम केलेल्या अंकितने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


आपल्या नवजात बाळाला शुभेच्छा आणि प्रेम दिल्याबद्दल अंकितने चाहत्यांचे आभार मानले आहेत. अंकितने लिहिले आहे,"आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या सर्वांचे प्रेम मिळण्यासाठी कुटुंबात आता आणखी एका सदस्याची भर झाली आहे".


लग्नाच्या सहा वर्षानंतर अंकित आणि रुचीने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.  अंकित आणि रुची 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.  


'शुभ प्रसंगी शुभ बातमी…. नवीन पाहुणा लवकरच येतोय' अशा आशयाचं कॅप्शन देत अंकितने रुचीसोबतचे फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. अंकित लवकरच 'पावनखिंड' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





 संबंधित बातम्या


Preity Zinta : प्रीती झिंटाने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो


Bipin Rawat : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर कलाकारांनी व्यक्त केला शोक


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...


Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha