एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नथुरामाचा रंगमंचाला राम राम, शरद पोंक्षेंची घोषणा
गेल्या वीस वर्षात नाटकाला प्रेक्षकांनीही गर्दी केली. मात्र त्याचवेळी वादांनीही घेरलं. सुरुवातीपासूनच हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेलं ‘हे राम.. नथुराम’ हे नाटक आता बंद होणार आहे. येत्या महिन्याभरात शेवटचे दहा प्रयोग होणार आहेत. त्यानंतर या नाटकाचे प्रयोग केले जाणार नाहीत, असे शरद पोंक्षेंनी फेसबुकवरुन जाहीर केले.
आधी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि नंतर ‘हे राम..नथुराम...’ असा 20 वर्षांचा नाटकाचा प्रवास आहे. गेल्या वीस वर्षात नाटकाला प्रेक्षकांनीही गर्दी केली. मात्र त्याचवेळी वादांनीही घेरलं. सुरुवातीपासूनच हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
नाटक बंद करण्याचे कारण सांगातना शरद पोंक्षे म्हणाले, “नाटक बंद करण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वय. नथुराम फासावर चढला तेव्हा त्याचे वय 39 होते आणि माझे वय आता 52 आहे. मी वयाच्या 52 वर्षांपर्यंत नथुरामची भूमिका खेचली. प्रेक्षकांवर एकप्रकारे लादली.”
या नाटकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीली. शिवाय, त्यांनी एबीपी माझाशी दिलखुलास गप्पाही मारल्या.
शरद पोंक्षे यांची मुलाखत :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement