Sharad Pawar : अनेक कारणांनी नाट्यसंमेलन (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) साजरा होण्यास उशीर झाला. हे संमेलन निर्विग्न होत आहे त्याचा आनंद आहे. काळानुरूप नाटक बदलत गेली कौटूंबिक नाटक सह आता ऐतिहासिक नाटक ही होत आहेत. नवनवीन विषय नाटकात येत आहेत. राज्यभर नाट्य संमेलन हा सोहळा रंगणार आहे, असे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्घाटन सोहळ्यादरम्यान म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकावर अप्रत्यक्ष टीका केली.


"वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे, असं शरद पवार म्हणाले". 


शरद पवार यांची 'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकावर अप्रत्यक्ष टीका


शरद पवार 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकावर अप्रत्यक्ष टीका करत म्हणाले," वसंत कानेटकर यांचे 'रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा' हे नाटक महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करते, परंतू आज महाराज अधिक हतबल झालेले दाखवले असे भासते, 'रायगडाला जेंव्हा जाग येते' या नाटकात जाग म्हणजे 'उभारी' असा अर्थ अभिप्रेत आहे... मात्र त्या मध्ये महाराजांचे शल्य अधिक दाखवले आहे, मी हे नाटक दिल्लीत पाहिले, सध्याचे प्रेक्षक महाराजांना कुटुंब कलहातील का दाखवले असा प्रश्न विचारतील, आणि पुरावे ही मागतील". 


शरद पवार पुढे म्हणाले,"ऐतिहासिक नाटकाची प्रेक्षक वाट पाहतो. पण इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहास सोयीने दाखवणे आणि काही खल प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणे थांबवणे गरजेचे आहे". 


मागेल त्याला 'खुर्ची' ही आपल्याकडे योजना आहे : उदय सामंत 


नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान उदय सामंत म्हणाले,"मागेल त्याला खुर्ची ही आपल्याकडे योजना आहे, त्यामुळं मंचावर चं शंभर खुर्च्या भरल्या आहेत. प्रशांत दामले म्हणाले की आम्ही 365 दिवस 24 तास अभिनय करतो. पण दामले साहेब आमच्यावरचा एक आरोप दूर करा की राजकीय नाट्य मंचावर आले की राजकारणी हस्तक्षेप करतात. हे आरोप तुम्ही दूर केलेत, याबद्दल प्रशांत दामले यांचे आरोप आहेत. मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब हे एकाच मंचावर आहेत. हे शंभरावे नाट्य संमेलन झाल्यावर या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घ्यावी. कलाकारांच्या घरांचा आणि बॅक स्टेजचा प्रश्न आपण मिटवूयात. विक्रम गोखले यांनी 5 कोटींची दोन एकर जागा वृद्धाश्रम साठी दिलेली आहे. 9 कोटी 73 लाखांमधील हिस्सा पेन्शनसाठी ठेवण्याचा निर्णय आम्ही नाट्य परिषदेच्या विश्वस्तांनी घेतलेला आहे". 


संबंधित बातम्या


Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : नेते कलाकारांसारखे परफॉर्मन्स करतात, परंतु तुमच्यासारखी कला आम्ही करू शकत नाही; मुख्यमंत्र्यांचा प्रशांत दामलेंना टोला