Shamshera Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि  संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या 'शमशेरा' (Shamshera) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमधील संजय दत्त आणि रणबीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


'कर्म से डकैत, कर्मसे आझाद' हा रणबीरचा डायलॉग 'शमशेरा'च्या टीझरमध्ये ऐकू येतोय. अभिनेत्री वाणी कपूरनं 'शमशेरा'चा हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाणीनं या टीझरला कॅप्शन दिलं, ' एक नाव. एक तारणहार, लेजेंड शमशेराचा टीझर 24 जून रोजी रिलीज होणार आहे.' तसेच वाणीनं या चित्रपटाची रिलीज डेट 22 जुलै असल्याचं देखील सांगितलं आहे. चित्रपटामध्ये वाणी कपूर ही एका डान्सरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटामध्ये या डान्सरच्या प्रेमात शमशेरा पडतो. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये रणबीर हा डबल रोड साकारणार आहे.   चित्रपटामधील भूमिकेसाठी वाणी कपूरनं कथ्थक नृत्याचे ट्रेनिंग घेतले. हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 






अभिनेत्री आलिया भटनं रणबीरचा शमशेरा चित्रपटामधील लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. आलियानं ही पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ,"शुभ सकाळ". आलियाने शेअर केलेल्या रणबीरचा लूक खूपच हटके आहे. वाढलेले केस आणि दाढी, तसेच हातात हत्यार असा रणबीरचा लूक दिसत होता. आदित्य चोप्रानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर करण मल्होत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. रणबीर, संजय आणि वाणीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहे. शमशेरासोबतच रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीरसोबत आलिया भट प्रमुख भूमिका साकारणार आहे. 


हेही वाचा: