Ranbir Kapoor Shamshera Poster : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'शमशेरा' (Shamshera) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याआधीपासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमात रणबीरसोबत संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूरदेखील (Vaani Kapoor) दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. आता या सिनेमाचे पोस्टर लीक झाले आहे. सोशल मीडियावर रणबीरचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या सिनेमात रणबीरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे.


'शमशेरा'चे पोस्टर लीक


'शमशेरा' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर रणबीरचा लूक व्हायरल होत आहे.  'शमशेरा' सिनेमात रणबीरचे लांबलचक केस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच त्याने हातात एक हत्यार पकडले आहे. रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चे पोस्टर लीक झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 




'शमशेरा' अनेक भाषेत होणार प्रदर्शित


हिंदीशिवाय 'शमशेरा' तामिळ आणि तेलगू भाषांमध्येदेखील प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या निर्मिती अंतर्गत निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे.
करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या सिनेमाची कथा 1800 च्या उत्तरार्धावर आधारित आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते संजय दत्त यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.


टीझर आऊट


'शमशेरा'च्या या टीझरमध्ये सिनेमातील मुख्य कलाकार म्हणजे संजय दत्त, वाणी कपूर आणि रणबीर कपूर दिसत आहेत. हा सिनेमा स्वातंत्र्यपूर्व काळातील एका डाकूची कथा सांगणारा आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.