Shamshera Song : लवकरच शमशेरा  (Shamshera)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी शमशेरा चित्रपटामधील 'जी हुजूर' हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. शमशेरा या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील फितूर हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये रणबीर आणि वाणी यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.


शमशेरामधील फितूर हे गाणं अरिजीत सिंह आणि नीती मोहन यांनी गायले आहे. 3 मिनीट 24 सेकंदाच्या या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मिथुननं या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.  वाणीनं या चित्रपटात सोना नावाच्या डान्सरची भूमिका साकारली आहे तर रणबीरनं या चित्रपटात डबल रोल साकारणार आहे. या दोघांची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पाहा गाणं:




शमशेरा हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 'शमशेरा' चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.


यशराज फिल्म्सच्या निर्मिती अंतर्गत निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 1800च्या उत्तरार्धावर आधारित आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.


हेही वाचा: