Ranbir Kapoor Look : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'शमशेरा' (Shamshera) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच 'शमशेरा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील रणबीरच्या लूकने मात्र प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. रणबीरने या सिनेमात बल्लीचे पात्र साकारले आहे. हे पात्र साकारण्यासाठी रणबीरला खूप मेहनत करावी लागली आहे. 


रणबीर कपूरचा बल्लीचे पात्र साकारतानाचा व्हिडीओ नुकताच निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. रणबीरला बल्लीचे पात्र साकारण्यासाठी तासनतास वेळ लागत असे. रणबीरच्या लूकवर निर्मात्यांनी लक्ष दिले होते. दुसरीकडे रणबीरने त्याच्या व्यायामाकडेदेखील लक्ष दिले होते. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये रणबीरच्या हातात कुऱ्हाड असून त्याच्या विखुरलेल्या लांबलचक केसांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. 


हाहात कुऱ्हाड, विखुरलेले लांबलचक केस असा नव्या पोस्टरमधील रणबीरचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'शमशेरा' सिनेमात संजय दत्त एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणबीर कपूर एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, 'शमशेरा' सिनेमा स्वातंत्र्यपूर्व काळावर भाष्य करणारा आहे. 


22 जुलैला सिनेमा होणार रिलीज


'शमशेरा' हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलगू भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. 'शमशेरा' सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रोनित रॉय देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.



संबंधित बातम्या


Shamshera New poster : 'शमशेरा'चे नवे पोस्टर आऊट; हाहात कुऱ्हाड, विखुरलेले लांबलचक केस...रणबीरचा दमदार लूक


Shamshera Trailer : 'ये कहानी है शमशेरा की'; 'शमशेरा' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज