Shamshera Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. रणबीरचा 'शमशेरा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात रणबीरसह वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई केली आहे.
'शमशेरा' या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसतो आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.
रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 10.25 कोटींची कमाई
रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा बिग बजेट सिनेमा आहे. कोरोना महामारीनंतर प्रदर्शित होणारा हा दुसरा बिग बजेट सिनेमा आहे. 4000 स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई केली आहे. मुंबई, दिल्ली आणि यूपीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.
'भूल भुलैया 2' समोर 'शमशेरा' पडला मागे
'भूल भुलैया 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 14 कोटींची कमाई केली होती. तर 'शमशेरा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.25 कोटींची कमाई केली आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिनेमागृहाच धुमाकूळ घालत अनेक रेकॉर्ड केले होते.
'शमशेरा' हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा आधी 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यशराज फिल्म्सच्या निर्मिती अंतर्गत निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 1800च्या उत्तरार्धावर आधारित आहे.
संबंधित बातम्या