Manoj Muntashir On National Award : मनोरंजन सृष्टीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2022) काल (22 जुलै) घोषणा झाली आहे. यात मनोज मुन्तशिर (Manoj Muntashir) यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोजने 'सायना' (Saina) सिनेमासाठी गीत लिहिले होते.
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करत मनोज म्हणाला, "सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मला जाहीर झाला आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यंदाचा पुरस्कार मला जाहीर झाल्याचा नक्कीच आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहते कौतुक करत आहे. या सर्व गोष्टी पाहून मी भारावलो आहे".
'केसरी' सिनेमातील 'तेरी मिट्टी' या गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार न मिळाल्याने मनोजने प्रायोजित पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. पण आता मनोज राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहे. यासंदर्भात माहिती देत मनोज म्हणाला, मी कोणत्याही प्रकारचा प्रायोजित पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. आजही मी प्रायोजित पुरस्कार स्वीकारत नाही".
'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत' मराठीचा बोलबाला
'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पाश्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संबंधित बातम्या