एक्स्प्लोर

#MeToo बॉलिवूडचे 'बॅड बॉय' शक्ती कपूर यांची ऑडिओ क्लिप

बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘बॅड बॉय’ म्हणून परिचीत असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर देशभरात #MeToo  वादळ घोंघावत आहेत. या वादळात बॉलिवूड, राजकारण, क्रीडा, शैक्षणिक संस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या वादळात अडकले आहेत. #MeToo या मोहिमेबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘बॅड बॉय’ म्हणून परिचीत असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शक्ती कपूर यांच्यावर अद्याप कोणी आरोप केलेले नाहीत, मात्र त्यांनी या अभियानावर काही प्रश्न उपस्थित करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. त्याबाबतची ऑडिओ क्लिप शक्ती कपूर यांनी एबीपी न्यूजकडे पाठवली आहे. “अशा प्रकारणांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे आरोप केल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता, जोवर कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत बदनामी रोखावी, मग तो कोणी कलाकार, व्यावसायिक किंवा नेता असो, कोर्टात सिद्ध झाल्यानंतरच नाव जाहीर करावं”, असं आवाहन शक्ती कपूर यांनी केलं आहे. केवळ आरोप झाल्याने अनेकांचं आयुष्य बरबाद झालं आहे. त्यांचं संपूर्ण करिअरच संपतं. त्याला नोकरीवरुन हाकललं जातं. स्वत:ची बायका मुलंही त्याला संशयाने पाहू लागतात, असं शक्ती कपूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून, याबाबत कायदा करावा, असं आवाहन शक्ती कपूर यांनी 1.55 मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये केलं आहे.शक्ती कपूर यांनी स्वत:वर ओढवलेल्या परिस्थितीचाही दाखला दिला आहे. त्यामुळे केवळ आरोप झाल्यानंतर तातडीने नाव जाहीर न करता, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर नाव जाहीर करावं, असं आवाहन शक्ती कपूर यांनी मोदींना केलं. सध्या अनेकांवर आरोप होत आहेत. दिग्दर्शक साजिद खानला सिनेमातून वगळलं, हृतिक रोशनवर आरोप झाले, अमिताभ बच्चन यांचंही नाव आलं आहे, उद्या मोदीसाहेब तुमच्यावरही आरोप होतील, तर तुम्ही काय करणार? असा प्रश्न शक्ती कपूर यांनी विचारला आहे. शक्ती कपूर आणि पूनम पांडे यांच्या आगामी 'जर्नी ऑफ कर्मा' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, शक्ती कपूर यांना तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळ त्यांनी आपल्याला हे प्रकरण माहित नसल्याचं म्हटलं होतं.  मात्र त्यांना तनुश्रीने 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर 10 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवरुन केलेल्या आरोपाची माहिती दिली, तेव्हा शक्ती कपूर म्हणाले, 10 वर्षांपूर्वी? मला काही माहित नाही. 10 वर्षांपूर्वी मी खूपच लहान मुलगा होता” ऑडिओ क्लिप संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget