मुंबई : 'मोहब्बते' चित्रपटातील आर्यन आणि मेघाची जोडी असो, वा 'देवदास'मधले देव आणि पारो... अगदी 'जोश' सिनेमातले मॅक्स आणि शर्ली ही भावंडंसुद्धा... बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या जोडीचे असंख्य चाहते आहेत. 2000 च्या आसपास शाहरुख-अॅशला एकत्र पाहण्याची फॅन्सची इच्छा होती, मात्र शाहरुखने तसं होऊ दिलं नाही.
निर्माते शाहरुख-ऐश्वर्याला एकत्र साईन करण्याची धडपड करत होते. अगदी 'शक्ति' चित्रपटात 'इष्क कमिना' आयटम साँगमध्येही दोघांना एकत्र आणण्यात आलं. मात्र खुद्द शाहरुखनेच पाच बॉलिवूडपटांमधून ऐश्वर्याचा पत्ता कट केला. त्याचं कारणही इंटरेस्टिंग आहे.
शाहरुखने ऐश्वर्याला डच्चू दिलेला पहिला चित्रपट म्हणजे 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चलते चलते'. ऐश्वर्याला काढून तिच्याऐवजी राणी मुखर्जीची वर्णी लावण्यात आली. 'इंडिया टुडे'तील एका जुन्या रिपोर्टनुसार याच चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा सलमान खानने राडा केला होता.
ऐश्वर्या आणि सलमान त्यावेळी रिलेशनशीपमध्ये होते, मात्र दोघांमध्ये कुरबुरी सुरु होत्या. मद्यपान करुन सलमान 'चलते चलते'च्या सेटवर आला आणि त्याने धिंगाणा घातला. त्यामुळे शाहरुखने ऐश्वर्याची उचलबांगडी केली. 'आम्ही एकत्र सिनेमे करणार होतो, मात्र अचानक ते माझ्या हातातून गेले. पण मला त्याचं कारण माहित नाही' असं ऐश्वर्याने एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं.
ऐश्वर्याच्या हातातून निसटलेला दुसरा बिग बजेट चित्रपट म्हणजे यश चोप्रा यांचा 'वीर झारा'. तगडी स्टारकास्ट, सुंदर लोकेशन्स, आणि यश चोप्रा यांच्या कारकीर्दीतला अखेरचा चित्रपट. शाहरुखसोबत या सिनेमात प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत झळकली, मात्र हा रोल आधी ऐश्वर्याला ऑफर झाला होता.
'एखाद्या कलाकारासोबत नवीन प्रोजेक्ट सुरु करायचा आणि त्यानंतर त्याचा कोणताही दोष नसताना त्याला काढून टाकायचं हे चूक आहे. ऐश्वर्या माझी चांगली मैत्रिण आहे. वैयक्तिकरित्या मी खूप चुकीचं वागलो. पण निर्माता म्हणून माझा निर्णय योग्यच वाटतो. मी तिची माफी मागतो' असं शाहरुख म्हणाला होता.
ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मैत्रीत कधीच वितुष्ट आलं नाही. म्हणजेच ऐश्वर्याने शाहरुखचा निर्णय समजूतदारपणे घेतला, असंच दिसतं.
2014 मध्ये शाहरुख आणि फराह खान यांनी ऐश्वर्याला 'हॅपी न्यू इयर' ऑफर केला, मात्र तिने तो नाकारला. अर्थात 'ऐ दिल है मुश्किल'च्या निमित्ताने दोघं एकत्र आले.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हणून शाहरुखने 'वीर-झारा'सह 5 सिनेमातून ऐश्वर्याला काढलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2018 11:50 AM (IST)
शाहरुखने ऐश्वर्याला डच्चू दिलेला पहिला चित्रपट म्हणजे 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चलते चलते'.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -