Shahrukh Khan New Film : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुखने गेले अनेक दिवस कोणताही सिनेमा केलेला नाही. पण आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुख खान लवकरच साऊथचा दिग्दर्शक अॅटलीच्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 26 जानेवारीला यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
शाहरुख खान लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार
साऊथचा सुपरस्टार विजयसोबत बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे केल्यानंतर दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली आता शाहरुख खानसोबत एका बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग करत आहेत या सिनेमाच्या शीर्षक आणि कथानकाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 26 जानेवारी रोजी या चित्रपटाची अधिकृत घोषणा निर्माते करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शाहरुखच्या या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान बाप आणि मुलाची दुहेरी भूमिका साकारणार आहे. साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हरही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
शाहरुखने 'पठाण'च्या शूटिंगला केली सुरुवात
शाहरुख खानने अलीकडेच त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो शाहरुखने शेअर केले होते.
संबंधित बातम्या
Acharya Postponed : कोरोनामुळे 'आचार्य' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे
Bade Achhe Lagte Hain 2 : राम आणि प्रियाची गोष्ट 100 एपिसोड्सची झाली, नकुल आणि दिशाने व्यक्त केली नवी आशा
Kiran Rao चे दिग्दर्शनात कमबॅक, Aamir Khan करणार सिनेमाची निर्मिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha