Kiran Rao : चित्रपट दिग्दर्शक किरण राव (Kiran Rao) पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात उतरली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण रावचा घटस्फोट झाला होता. त्यांतर त्यांचे चाहते काहीसे नाराज झाले होते. पण आता किरण आणि आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. किरण रावच्या आगामी सिनेमाची निर्मिती आमिर खान करणार आहे. 


11 वर्षांपूर्वी किरण रावने 'धोबीघाट' (2010) नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'धोबीघाट' सिनेमाची निर्मितीदेखील आमिरने केली होती. त्यानंतर आता 'आमिर खान प्रॉडक्शन हाऊसच्या' आगामी सिनेमाचे दिग्दर्शन किरण करणार आहे. गेल्या वर्षी 13 जुलै रोजी दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. 


वेगळं होताना दोघांनी काय म्हटलं
आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं."


किरण दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमाचे शूटिंग 8 जानेवारीपासून महाराष्ट्रातील विविध भागात सुरू झाले आहे. हा एक सामाजिक विनोदी सिनेमा आहे. बालिका वधू' मालिकेतील स्पर्श श्रीवास्तव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. स्पर्श व्यतिरिक्त प्रतिभा रत्न आणि नितांशी गोयल देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रतिभाने झी टीव्हीवरील 'कुर्बान हुआ' या मालिकेत काम केले आहे, तर नितांशी 'पेशवा बाजीराव' या मालिकेत दिसली होती.


सिनेमाचे लेखन बिप्लव गोस्वामी यांनी केले आहे. तर चित्रपटाची पटकथा स्नेहा देसाई यांनी लिहिली आहे. चित्रपटाची गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली असून ती संगीतबद्ध करण्याची जबाबदारी राम संपत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने यांच्या बाजूने : अनिता दाते 


Bigg Boss 15 : सलमान खानने घेतली तेजस्वीची शाळा, म्हणाला, ज्या थाळीत खाता...


Verses Of War : सैन्य दिनी Vivek Oberoi ने शेअर केला 'वर्सेस ऑफ वॉर' सिनेमाचा टीझर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha