Acharya Postponed : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. आता दाक्षिणात्य सुपसस्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या 'आचार्य' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा 4  फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. गेले अनेक दिवस चाहते सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. सिनेमा नेमका कधी रिलीज होईल, याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.





चिरंजीवी आणि रामचरणची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार 
निर्मात्यांनी ट्विटरवर सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 'आचार्य'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाची नवीन रिलीज डेट लवकरच घोषित केली जाईल, कृपया सुरक्षित रहा". या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला शिवा यांनी केले आहे. आचार्यमध्ये पहिल्यांदाच वडील-मुलाची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 


वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. जर्सी, आरआरआर, राधे श्याम, पृथ्वीराज, वलिमै या बिग बजेट सिनेमांचा यात समावेश आहे.


संबंधित बातम्या


Bade Achhe Lagte Hain 2 : राम आणि प्रियाची गोष्ट 100 एपिसोड्सची झाली, नकुल आणि दिशाने व्यक्त केली नवी आशा


Kiran Rao चे दिग्दर्शनात कमबॅक, Aamir Khan करणार सिनेमाची निर्मिती


Verses Of War : सैन्य दिनी Vivek Oberoi ने शेअर केला 'वर्सेस ऑफ वॉर' सिनेमाचा टीझर


Ratan Tata share Photo With Rockstar Slash : रतन टाटा यांनी शेअर केला रॉकस्टार स्लॅशसोबतचा खास फोटो; रणवीरच्या कमेंटनं वेधलं लक्ष


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha