एक्स्प्लोर

कर्करोगाच्या अफवांवर खुद्द शाहीद कपूरचं ट्वीट

शाहीदने ट्वीट करुन आपली प्रकृती उत्तम आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन फॅन्सना केलं आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरला कर्करोगाची लागण झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर शाहीदची प्रकृती ठणठणीत असल्याचं कपूर कुटुंबाने स्पष्ट केलं होतं. आता, खुद्द शाहीदनेही ट्वीट करुन आपली प्रकृती उत्तम असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. एका फिल्मी वेबसाईटने नाव न घेता बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचा लेख छापला होता. या लेखातील अभिनेत्याचं वर्णन शाहीद कपूरकडे अंगुलीनिर्देश करणारं होतं. त्यानंतर चाहत्यांमध्ये शंकांचं वादळ उठलं आणि जो-तो या बातमीमागील तथ्य जाणण्याचा प्रयत्न करु लागला. कर्करोगविषयक अफवांची कुणकुण शाहीदला लागताच त्यालाही हसू फुटलं होतं. आता, शाहीदने ट्वीट करुन आपली प्रकृती उत्तम आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन फॅन्सना केलं आहे. शाहीदच्या ट्वीटनंतर अवघ्या काही वेळातच चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. अनेक जणांनी त्याला सुदृढ आयुष्य आणि आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या. 'एबीपी माझा'ने शाहीद कपूरच्या कुटुंबीयांशी संपर्क केला असता या अफवा तथ्यहीन असल्याचं सांगत त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. 'ही बातमी कुठून आली? अशा बातम्या पसरवण्यात कोणाला काय आनंद मिळतो?' असे प्रश्न कपूर कुटुंबाने उपस्थित केले होते. अफवांचा बाजार उठला त्यावेळी शाहीद वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेला होता. 37 वर्षांच्या शाहीदने 2015 मध्ये 13 वर्षांनी तरुण मीरा राजपूतशी विवाह केला. त्यांना दोन वर्षांची मिशा आणि दोन महिन्यांचा झैन हा मुलगा आहे. प्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर त्याचे वडील, तर अभिनेत्री नीलिमा अझीज त्याची आई. मात्र घटस्फोटानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी विवाह केला, तर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकशी लग्न केलं. 2003 मध्ये शाहीदने इष्क विष्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शाहीदची भूमिका असलेले जब वि मेट, कमिने, हैदर, उडता पंजाब, पद्मावत असे अनेक चित्रपट गाजले आहेत. यापूर्वी, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर कपूर खानदानाने चाहत्यांना धीर ठेवण्याचं आवाहन केलं होतं. तर इरफान पठाण, सोनाली बेंद्रे यासारख्या प्रसिद्ध कलाकारांनाही कॅन्सरनी गाठलं.

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget