Ajay Devgan Shaitan Movie : अजय देवगनचा (Ajay Devgan) आगामी चित्रपट 'शैतान'ची (Shaitan) मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा होती. दरम्यान आता हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच अजय देवगने या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. हॉरर आणि थ्रिलर असा या चित्रपटाचा जॉनर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर देखील समोर आला होता. या चित्रपटात अजय देवगनसह इतरही कलाकार पाहायला मिळणार आहेत. तसेच आता या चित्रपटाचे पोस्टर आता लॉन्च करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगन फार इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरला त्याने कॅप्शन दिले आहे की, जब बात परिवार पर आए, तो वह हर 'शैतान' से लड़ जाएगा.' अजय देवगनच्या या पोस्टरमध्ये अभिनेत्याच्या डोळ्यात शैतानची भीती स्पष्टपणे दिसून येतेय. हा एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात आर माधवन हा खलनायकच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 






8 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


हा सिनेमा 8 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. विकास बहल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अजय देवगन, ज्योती देशपांडे, कुमार पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. या सिनेमात अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दृश्यम आणि दृश्यम 2 नंतर अजय देवगन पुन्हा एकदा एक कौटुंबिक गोष्ट घेऊन येणार आहे. त्याची ही गोष्ट आता प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Avdhoot Gupte Birthday : सारेगमपचा स्पर्धक ते परिक्षक, 'ऐका दाजीबा'म्हणत उमटवलं संगीतविश्वात नाव, अवधूत गुप्तेचा सुरेल प्रवास