Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे आणि नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शिवरायांचा इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा यामागचा हेतू आहे. शिवजयंतीनिमित्त शिवकालीन कथानकावर भाष्य करणारे सिनेमे पाहायलाच हवेत.


सिंहगड (Sinhagad) : 'सिंहगड' हा सिनेमा 1923 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बाबुराव पेंटर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. बाबुराव पेंटर आणि व्ही. शांताराम या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.


बाळ शिवाजी (Bal Shivaji) : शिवरायांच्या बालपणीच्या पराक्रमावर भाष्य करणारा 'बाळ शिवाजी' हा सिनेमा आहे. हा सिनेमा 1981 साली प्रदर्शित झाला होता. प्रभाकर पेंढारकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 


छत्रपती शिवाजी (Chhatrapati Shivaji) : 'छत्रपती शिवाजी' या सिनेमाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. हा सिनेमा 1952 मध्ये प्रदर्शित झाला होता. 


शेर शिवाजी (Sher Shivaji) : 'शेर शिवाजी' हा सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात स्मिता पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, जयश्री गडकर, अमरिश पुरी मुख्य भूमिकेत होते. 


सर्जा (Sarja) : 'सर्जा' सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता. अजिंक्य देव, निळू फुले, रमेश देव, कुलदीप पवार आणि सीमा देव या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. 


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (me shivajiraje bhosale boltoy) : एका मध्यमवर्गीय माणसाला शिवाजी महाराजांचे विचार कसे मदत करू शकतात हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा 2009 साली प्रदर्शित झाला होता.


फर्जंद (Farzand) : फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


फत्तेशिकस्त (Fatteshikast) : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.


फर्जंद (Farzand) : फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरांनी केले आहे. हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


शेर शिवराज (Sher Shivraj) : 'शेर शिवराज' या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या चतुराईने आणि धैर्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा केलेला पराभव पाहायला मिळाला होता.


शिवरायांचा छावा (Shivrayancha Chhava) : 'शिवरायांचा छावा' हा सिनेमादेखील 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व.  धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या  या महान योद्धयाची  संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात घडत आहे.


संबंधित बातम्या


Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, कुठले रस्ते बंद, कुठले सुरु? जाणून घ्या