Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' चित्रपटानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नुकतेच शाहरुख खानने अॅटलीच्या कमर्शिअल एंटरटेनर चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले असून आजपासूनच त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे.


एटलीच्या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर शाहरुख खान आजपासून राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. राजकुमारी हिराणी यांनी शुक्रवारी शाहरूखच्या तापसी पन्नूसोबतच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.  




प्रोडक्शन टीमने पंजाब येथील एका गावाचा सेट मुंबईत बनवला असून संपूर्ण पुढील दोन आठवडे या ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. राजकुमार हिरानी या चित्रपटाच्या वेगवेगळ्या भागांचे शूटिंग मुंबईत करणार असून, त्यानंतर ते पुढील शेड्यूल लंडन आणि बुडापेस्टमध्ये शूट करणार आहेत.


 शाहरुख  या चित्रपटात तापसीसोबत दिसणार आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एटलीच्या चित्रपटात किंग खानसोबत साऊथची सुपरस्टार नयनतारा आणि बॉलिवून अभिनेत्री सान्या मल्होत्राही दिसणार आहे. 


महत्वाच्या बातम्या


Video : हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं


Tiger 3 : शाहरुख खान आणि सलमान खान जूनमध्ये करणार 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात


Shah Rukh Khan : ‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया...’