Tiger 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानदेखील या सिनेमात दिसणार आहे. दोघांचेही चाहते दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची वाट पाहत होते. 'टायगर 3' सिनेमात दोघे एकत्र काम करत प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करणार आहेत.


शाहरुख जून महिन्यात सलमानसोबत 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. शाहरुख सध्या स्पेनमध्ये 'पठाण' सिनेमाचे शूटिंग करत आहे. तर सलमान लवकरच साजिद नाडियादवालाच्या 'कभी ईद कभी दिवाळी'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.





सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर आता या सिनेमाचा तिसरा भाग 'टायगर-3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर-3' हा सिनेमा 21 एप्रिल 2023 म्हणजेच ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा सिनेमा तमिळ, हिंदी, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!


The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...


Shah Rukh Khan : ‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया...’


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha