Pathaan : बॉलिवूडचा किंग खानच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी 'पठाण' चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला होता. मात्र, त्यात फक्त अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) दिसले होते. त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लूक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. पण, त्यांना बॅकग्राउंडमध्ये फक्त त्याचा आवाज ऐकू आला. आता शाहरुखनेच त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. नुकताच शाहरुख खानने त्याच्या 'पठाण'चा लूक रिव्हील केला आहे, ज्यामध्ये तो त्याचे अॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे.


शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा लूक शेअर केला आहे. फोटोतील शाहरुखची स्टाईल पाहण्यासारखी आहे. शाहरुखने एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे अॅब्स स्पष्ट दिसत आहेत. यासोबतच त्याचे लांब केस आणि काळ्या सनग्लासेसमध्ये तो किलर दिसत आहे. शाहरुखच्या या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेय.


पाहा पोस्ट :



शाहरुखने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शाहरुख थोडा थांबला तरी पठाणला कसे थांबवणार….. अॅप्स आणि ऍब्स दोन्ही बनवणार….’ शाहरुखच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि त्याचा लूक रिलीज केल्याबद्दल त्याचे आभार मानले.


लवकरच लाँच करणार स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म!


पत्नी गौरी खानने देखील शाहरुख खानचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘पठाण वाईब, लाईक करा.’ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानदेखील लवकरच स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म आणणार आहे, ज्याचे नाव आहे 'SRK Plus' असे आहे. शाहरुख डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत याचे प्रमोशन करत आहे, ज्याची टॅगलाइन 'थोडा रुक शाहरुख' अशी आहे. या टॅगलाईनचा वापर करत, त्याने त्याच्या 'पठाण' चित्रपटातील लूक रिव्हील केला आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha