Shah Rukh Khan Main Hoon Na Sequel : बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात सीक्वेल चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक स्टार्सच्या चित्रपटांचे सीक्वेल बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आता बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. 'मैं हू ना' या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा सीक्वेल आणण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
शाहरुख खान पुन्हा एकदा मेजर रामच्या भूमिकेत
'मैं हू ना' चित्रपट 2004 मध्ये आलेला सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरला. फराह खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, तर शाहरुख खान आणि गौरी खान या चित्रपटाचे निर्माते होते. फराह खानने मैं हू ना' चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आणि तिचा हा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. आता फराह खान लवकरच शाहरुख खानच्या या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा दुसरा भाग आणणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फराह खान 'मैं हू ना 2' चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे, यासंदर्भात तिने शाहरुखशीही संपर्क साधल्याची माहिती आहे.
'मैं हू ना' चित्रपटाचा सीक्वेल येणार
शाहरुख खान आणि गौरी खान 'मैं हू ना' चित्रपटाचे निर्माते होते. 'मैं हू ना' शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट बॅनरचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज होताच धमाका केला. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि गाणी सर्वच बाबींचं प्रेक्षकांनी तोंड भरुन कौतुक केलं. शाहरुख खान, गौरी खान यांनी या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये निर्माता म्हणून डेब्यू केला, तर फराह खानने दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला. हे दोन्ही डेब्यू हिट ठरले.
'मैं हू ना 2' चित्रपटाची तयारी सुरु
शाहरुख खान आणि फराह खान यांनी 'मैं हू ना' चित्रपटानंतर अनेक हिट चित्रपट दिले. आता लवकरच शाहरुख आणि फराह खानची मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'मैं हू ना 2' चित्रपटासाठी फराह खानने शाहरुख खानशी संपर्क केला असून शाहरुखनेही या चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवल्याची माहिती आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, फराह खान लवकरच 'मैं हू ना 2' साठी काम सुरु करणार असल्याची माहिती आहे, सध्या ती चित्रपटाच्या स्क्रीनप्लेवर काम करत आहे.
कथा आणि स्क्रीनप्लेवर काम सुरु
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि फराह खान 'मैं हू ना' चित्रपटाचा गांभीर्याने विचार करत असून लवकरच यावर काम सुरु करणार आहेत. चित्रपटाची कथा आणि स्क्रीनप्लेसाठी सध्या वेगवेगळ्या कल्पना शोधण्याचं काम सुरु आहे, कारण या चित्रपटाची कथा पहिल्या चित्रपटासारखी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी हवी. 'मैं हू ना' चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता, त्याचा सीक्वेलही तितकाच दमदार असणं गरजेचं आहे.
'मैं हू ना 2'बद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता
'मैं हू ना' चित्रपटाच्या सीक्वेलबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच फराह खान आणि शाहरुख खान चित्रपटाच्या स्क्रीनप्लेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. शाहरुख खानची लेक सुहाना खान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :