Shah Rukh Khan-Aryan Khan OTT Debut : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान मुलगा आर्यन खानसोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सने शाहरुखचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख एका नवख्या दिग्दर्शकावर भडकल्याचं दिसत आहे. हा नवखा दिग्दर्शक दुसरी कुणी नसून त्याचा मुलगा आर्यन खान आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या टीझरमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खान खास भूमिकेत दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मनोरंजनाचा डोस कायम ठेवण्यासाठी नवीन शो आणला आहे. या शोमध्ये बापलेक शाहरुख-आर्यनची जोडी खास अंदाजात पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्स शाहरुख खान आणि आर्यन खान यांचा नवीन शो घेऊन येत आहे. या शोची पहिली झलक समोर आली आहे.
शाहरुख खान लेक आर्यनसोबत करणार ओटीटी डेब्यू
नेटफ्लिक्सने शाहरुख खान आणि आर्यन खानच्या ओटीटी डेब्यूसाठी उत्तम मुहूर्त साधला आहे. नेटफ्लिक्स शाहरुख आणि आर्यनचा एक नवा शो घेऊन येत आहे. याची पहिली झलक नेटफ्लिक्सने शेअर केली आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'बैड्*स ऑफ बॉलीवुड' शोची पहिली झलक शेअर केली आहे. यामध्ये कॅमेऱ्यासमोर शाहरुख खान आणि कॅमेऱ्यामागे आर्यन खान असं चित्र पाहायला मिळत आहे. हा शो अभिनेता शाहरुख खानचा ओटीटी डेब्यू असणार आहे, यासोबतच शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान या शोद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या शोच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आर्यन खानच्या खांद्यावर असेल.
कसा असेल शो?
नेटफ्लिक्सच्या या नव्या शोचं नाव - The Ba***ds of Bollywood असं आहे. आता हा शो नेमका कशाबद्दल आणि कसा असणार आहे, हे सध्या एक गूढच आहे. टीझरमध्ये शाहरुख खान कॅमेऱ्यासमोर उभा राहून म्हणतोय, हा चित्रपट वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. पण कॅमेऱ्यामागे बसलेला दिग्दर्शक शाहरुखकडून वारंवार रिटेक मागतो. शेवटी शाहरुख रागावतो आणि म्हणतो, इथे तुझ्या वडिलांचं राज्य आहे का? यानंतर, स्क्रीनवर आर्यन खानचा चेहरा समोर येतो.
शोचा मजेदार टीझर समोर
वारंवार रिटेकमुळे कंटाळलेला शाहरुख स्वत:च्या मर्जीने अभिनय करतो पण, टीझरच्या शेवटी, आर्यन कॅमेरा रोल करायला विसरतो यामुळे शाहरुख रागावतो आणि आर्यनला मारण्यासाठी धावतो, ज्यामध्ये आर्यन स्वतःला वाचवण्यासाठी पळून जाताना दिसतो. दरम्यान, या शोसाठी शाहरुख खान सर्वात मोठा, सर्वात धाडसी असे शब्द वापरताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात हा शो एक ट्रॉप ट्रेंडिंग शो बनण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :