Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. दुसरीकडे किंग खानने 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. दरम्यान अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं दिली आहेत. 


शाहरुख खान आणि विराट कोहली दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. #ASKSRK या सेशनदरम्यान किंग खानला विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) एक प्रश्न विचारण्यात आला. एका चाहत्याने ट्वीट करत शाहरुखला विराट कोहलीबद्दल बोलण्यास सांगितलं. त्यावेळी किंग खान म्हणाला,"विराट कोहली खूप खूप प्रेम...विराट माझा जिगरी दोस्त आहे. तो यशस्वी व्हावा यासाठी मी नेहमीच प्रार्थना करतो. भाऊ आपल्याला जावयासारखा आहे". 






एका चाहत्याने शाहरुखला प्रश्न विचारला,"जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे? अनेक बातम्यांमध्ये खोटी आकडेवारी सांगितली जात आहे". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"शांत बस...आणि फक्त आकडे मोजत राहा. आकडे मोजताना लक्ष विचलीत होऊ देऊ नकोस". 






शाहरुख खान हेअर डायचा वापर करतो का? 


शाहरुख खानने पन्नाशी पार केली आहे. त्यामुळे एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की तुम्ही हेअर डायचा वापर करता का? त्यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"हाहा.. थोडं थोडं..नाही.. खरं तर खूप जास्त". 






'टायगर 3' या सिनेमात शाहरुख कधी झळकणार? 


शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'टायगर 3'मधील प्रश्न विचारत चाहत्याने विचारलं की,"टायगर 3' या सिनेमात तू मध्यांतराच्या आधी दिसणार आहेस की नंतर". यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"जेव्हा भाई बोलवणार तेव्हा येणार".






संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Ask SRK: "मी मन्नतमध्ये लग्न करु शकतो का?"; चाहत्याचा शाहरुखला प्रश्न; किंग खान उत्तर देत म्हणाला...