Shah Rukh Khan Ask SRK: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केले. या सेशनच्या माध्यमातून त्यानं सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलं.


"शूटिंग सुरु आहे. कॉल टाइमला थोड्या वेळाने आहे, असं सांगण्यात आलं आहे. म्हणून विचार केला की, तुम्ही माझ्यासारखे फ्री असाल तर तुमच्या सर्वांसोबत एक faasssttt AskSRK सेशन करूयात. चला सुरुवात,काहीही विचारा! " असं ट्वीट शाहरुखनं ट्विटवर शेअर केलं. या ट्वीटनंतर चाहत्यांनी शाहरुखला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.






एका नेटकऱ्यानं शाहरुखला ट्विटरवर प्रश्न विचारला, "मी मन्नतमध्ये लग्न करु शकतो का?" चाहत्याच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "लग्नाची वरात काढण्यासाठी तुझ्याकडे घोडा आहे का? (घोडा है तेरे पास बारात निकलने के लिए….?)" शाहरुखच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






"आपकी बिखरे बिखरे बालो का राज" असं ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं. या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "आशिक हूं ना….शराबी आंखे…बेहकी बेहकी चाल….हंस्ता हुआ चेहरा और बिखरे बिखरे बाल…"






एका चाहत्यानं शाहरुखला प्रश्न विचाराला, "सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट कोणती करता?" शाहरुखनं या प्रश्नाचं उत्तर दिलं, "मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यापासून दिवसाची सुरुवात करतो"






इतर महत्वाच्या बातम्या:


Jawan Poster On Truck: "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..."; ट्रकवर लिहिलाय 'जवान' मधील डायलॉग ; व्हिडीओ पाहून किंग खान म्हणाला...