Parineeti Chopra Raghav Chadha: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha)  यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून  परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता राघव चड्ढा यांनी एक खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


राघव चड्ढा यांची पोस्ट


राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  "परिणिती आणि मी तुमचे मानापासून आभार मानतो. आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आम्हाला कदाचित प्रत्येक मेसेजला वैयक्तिकरित्या रिप्लाय देण्याची संधी मिळाली नसेल कृपया तुम्ही हे जाणून घ्या की, आम्ही आनंदाने सर्व काही वाचत आहोत. आम्ही एकत्र या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, तुम्ही सर्व आमच्या पाठीशी उभे आहात हे जाणून घेतल्यानंतर आम्हाला खूप आनंद होत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद खरोखरच अमूल्य आहेत आणि यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो."






राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच त्यांच्या लग्नासोहळ्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये  राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे डान्स करताना दिसले.






उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.  


इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो; म्हणाले...