Shah Rukh Khan On Women Cricket Team Equal Payment: नुकताच बीसीसीआयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. बीसीसीआय सचिव जय शाहा (Jay Shah) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. ज्यानुसार आता कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयाबाबत नुकतच अभिनेता शाहरुख खाननं ( Shah Rukh Khan) एक खास ट्वीट केले आहे.
शाहरुखचं ट्वीट
जय शाहच्या ट्वीटला रिट्वीट करत शाहरुख खानने ट्विटरवर खेळाडूंसाठी खास संदेश लिहिला. त्याने बीसीसीआयच्या या निर्णयाचं कौतुक केले. त्यानं ट्वीटमध्ये लिहिले, "हा निर्णय एखाद्या चांगल्या फ्रंट फूट शॉटसारखा आहे, खेळ हा अनेक गोष्टींमध्ये समानता शिकवतो. मला आशा आहे की, हा निर्णय इतरांनाही असे करण्यास प्रेरित करेल."
तापसी आणि अनुष्कानं केलं कौतुक
शाहरुख खानसोबतच अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुष्का शर्मा यांनी देखील बीसीसीआयच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तापसीनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'समान कामासाठी समान वेतनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे, हा निर्णय घेतल्याबद्दल बीसीसीआयचे आभार.'
काया म्हणाले जय शहा?
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी बोलताना सांगितलं की, "आपण आता लैंगिक समानतेच्या एका नव्या युगात प्रवेश करतोय. अशा परिस्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी असेल. यापुढे महिला खेळाडूंनाही पुरुषांइतकीच मॅच फी दिली जाईल.'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Indian Team Players Match Fee : बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन