Happy Birthday Aditi Rao Hydari: 'दिल्ली 6 (दिल्ली-6)' मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अदिती राव हैदरीचे (Aditi Rao Hydari) नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. तिचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद येथे झाला. दिल्ली 6 च्या आधी अदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज अदिती राव हैदरीचा 36 वा वाढदिवस आहे. आदितीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याबद्दल...


अदितीचे लव्ह लाईफ


अदिती राव हैदरीनं वयाच्या 21 व्या वर्षी  सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधली. वयाच्या  17 व्या वर्षी अदितीची भेट सत्यदीप यांच्यासोबत झाली होती. दोघेही खूप जवळचे मित्र झाले आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर अदितीने सत्यदीपशी लग्न केले. पण, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. अदितीने 2013 मध्ये सत्यदीपसोबत घटस्फोट घेतला. 


आदिती राव हैदरी राजघराण्यातील आहे. ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. याशिवाय तिचे आजोबा जे. रामेश्वर राव तेलंगणाच्या वनपर्थीवर राज्य करत असत. 






अदिती राव हैदरीने तिच्या करिअरमध्ये 'रॉकस्टार', मर्डर-3 'दास देव' आणि 'पद्मावत' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या 'पद्मावत' चित्रपटातील अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं. यासोबतच अदिती राव हैदरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 


वाचा सविस्तर इतर बातम्या: 


Ekdam Kadam Marathi Movie : कॉलेजलाईफ अनुभवणाऱ्या तरुणाईंचा 'एकदम कडक' धुडगूस पाहा येत्या 2 डिसेंबरला