मुंबई : ज्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती तो 'जवान' (Jawan) चित्रपट अखेर प्रक्षेकांच्या भेटीस आला आहे. 7 सप्टेंबर रोजी शाहरुख खानचा (Saharukh Khan) 'जवान' हा चित्रपट रिलीज झाला. तर रिलीज झाल्यानंतर जवळपास अडीच लाख तिकिटांची विक्री झाली आहे. यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटासाठी उत्सुकता प्रकर्षाने जाणवते. तर या चित्रपटाच्या रिलीज आधीच 1,60,000 तिकीटांची विक्रमी विक्री झाली होती. दरम्यान शाहरुख खानच्या आतापर्यंतच्या चित्रपटांपैकी या चित्रपटाची झालेली आगाऊ विक्री ही सर्वोच्च असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ब्लॉगबस्टर होण्याच्या दिशेने सुखकर प्रवास सुरु झालाय. 


'जवान'चा पहिला दिवस


गुरुवार 7 सप्टेंबर रोजी जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने  19.35 कोटींचा गल्ला जमवला. तर पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईपेक्षा ही कमाई मात्र कमी असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे जरी तिकीटांची विक्रमी विक्री झाली असली तरी कमाईच्या बाबतीत पठाणला मागे टाकण्यात जवान हा कमी पडला असल्याचं म्हटलं जात आहे. आता तिकीट विक्रीच्या बाबतीत जरी जवानने विक्रम रचण्यास सुरुवात केली असली तरीही पठाणच्या कमाईचे रेकॉर्ड मोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  






हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला. तर मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादसह अनेक शहरांमध्ये या चित्रपटाने दमदार कमाई करण्यास सुरुवात केलीये. या चित्रपटामधील कलाकार, दिग्दर्शन, कथानक, कलादिग्दर्शन, संगीत आणि इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टींना या चित्रपटाला अगदी चार चांद लावले असल्याचं म्हटलं जातंय. 


किंग खानच्या लूकने वेधलं प्रक्षेकांचं लक्ष 


जवान चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या लूकने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. ट्रेलरमधूनच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. त्यामुळे चित्रपटातील किंग खानची भूमिका आणि त्याचा लूक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतयं. तर शाहरुख खानच्या पठाणनंतर पुन्हा एकदा तो त्याच्या चाहत्यांच्या भेटीला आलाय. म्हणूनच या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागलीये. 


हेही वाचा : 


Jawan : 'किंग खान'च्या 'जवान'चा विक्रम! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच रेकॉर्ड ब्रेक कमाई! 2 लाख तिकीटांचा टप्पा पार