Jawan Box Office Collection Day 1:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटाने गुरुवारी (7 सप्टेंबर) थिएटरमध्ये रिलीज होताच शानदार ओपनिंग केली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची  कमाई केली आहे.  जवान चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. जवान हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी ओपनर चित्रपट ठरला आहे. 'जवान' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी  सर्व भाषांमध्ये किती कोटींची कमाई केली?याबाबत जाणून घेऊयात...


Sacnilk च्या रिपोर्टनुसार, जवानने भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.जवानाने हिंदीत 65 कोटींचे कलेक्शन केले आहे. जवानाने तमिळ भाषेत पहिल्या दिवसाची कमाई 5 कोटींची कमाई केली. तर तेलगू भाषेत या चित्रपटानं  5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, जवान हा चित्रपट सर्वात जास्त 'ओपनिंग डे' कलेक्शन करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. 


ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे की, 'जवान' चित्रपट रिलीजच्या दिवशी जगभरात 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करेल."






विजय सेतुपतीने या चित्रपटात खलनायक कालीची भूमिका साकारली आहे. तर नयनतारानं एका प्रामाणिक पोलीस कर्मचारी नर्मदा ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणचाही कॅमिओ आहे.


जवान हा  एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. जवान  चित्रपटात एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे जो समाजातील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो.  भ्रष्टाचार,आत्महत्या, ढासळणारी आरोग्य व्यवस्था या मुद्द्यांबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे.


 'जवान' हा चित्रपट गौरी खान यांनी निर्मित केला आहे . तर गौरव वर्मा यांनी या चित्रपटाची सह निर्मिती केली आहे.  अॅटलीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धि डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 






इतर महत्वाच्या बातम्या:


Jawan Review : शाहरुख खानचा 'जवान' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...