Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शाहरुखचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. किंग खानला नापसंत करणाऱ्या मंडळींची संख्या खूपच कमी आहे. आजही लाखोंच्या हृदयावर शाहरुख खान राज्य करतो.  शाहरुख खान सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. पण शाहरुखचा फेव्हरेट स्टार कोण? फेव्हरेट अभिनेत्री कोण? असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का? आपल्या फिल्मी करिअरमध्ये शाहरुख खानने काजोल, रानी मुखर्जी, प्रीती जिंटा, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा सारख्या अभिनेत्रींसोबत खूप काम केलं आहे. काजोलसोबतची त्याची जोडी बॉलिवूडच्या नंबर वन जोडीमध्ये होती. बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये आपल्याला कोणती अभिनेत्री आवडते याचा खुलासा किंग खानने (King Khan) एका मुलाखतीत केला आहे. 


शाहरुख खानची फेव्हरेट अभिनेत्री कोण? (Shah Rukh Khan Favorite Actress)


अनुपम खेर यांच्या 'कुछ भी हो सकता है' या टॉक शोमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. दरम्यान आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न अनुपम खेर यांनी त्याला विचारला. या प्रश्नाचं शाहरुख खानने दिलेलं उत्तर चाहत्यांना हैराण करणारं आहे. शाहरुखने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण यातील कोणतीच अभिनेत्री त्याची फेव्हरेट नाही. शाहरुख खानच्या फेव्हरेट अभिनेत्रीने साठ-सत्तरच्या दशकात इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे.


शाहरुखने घेतलं 'हे' नाव


अनुपम खेर यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख खानने अभिनेत्री मुमताजचं नाव घेतलं आहे. मुमताजच्या सौंदर्याची आजही शाहरुखला भूरळ पडते. मुमताज यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1958 मध्ये आलेल्या 'सोने की चिडिंया' या चित्रपटात बालकलाकार म्हणून झाली. या चित्रपटानंतर मुमताज अनेक अॅक्शनपटात झळकली. पण 'दो रास्ते' या चित्रपटाने मुमताज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. भूमिका छोटी असली तरी त्या लोकप्रिय झाल्या. त्यानंतर मुमताजने त्यावेळच्या अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. 


शाहरुख खान पुन्हा बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यासाठी सज्ज (Shah Rukh Khan Upcoming Movies)


शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एकाचवर्षी शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. ऑपरेशन खुकरी, सैल्यूट, ब्रह्मास्त्र 2, पठाण 2, किंग, टायगर वर्सेस पठाण या किंग खानच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतील. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : "शाहरुख खानपेक्षा मला जास्त पैसे ऑफर झाले होते"; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अभिनेत्याचं वक्तव्य