Dunki Salaar Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. बॉक्स ऑफिसवर हो दोन्ही सिनेमे दणदणीत कमाई करत आहेत. पण प्रभासच्या सालारपेक्षा शाहरुखच्या डंकीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी आहे. 


'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Salaar Box Office Collection)


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'सालार' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.70 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.5 कोटी, चौथ्या दिवशी 46.30 कोटी, पाचव्या दिवशी 24.90 कोटी, सहाव्या दिवशी 15.1 कोटी आणि सातव्या दिवशी 13.50 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. एकंदरीतच रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने 308.90 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'डंकी'ने केली कोट्यवधींची कमाई


'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.20 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशी 30.70 कोटी, पाचव्या दिवशी 24.32 कोटी, सहाव्या दिवशी 11.56 कोटी आणि सातव्या दिवशी 10.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीतच रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने 161.1 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे.  


'डंकी' अन् 'सालार'चा जगभरात डंका


भारतीय बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा 'डंकी' डगमगलेला असला तरी जगभरात या सिनेमाचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. जगभरात किंग खानच्या 'डंकी' या सिनेमाचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा छप्परफाड कमाई करत आहे. जगभरात या सिनेमाने 305 कोटींची कमाई केली आहे.


प्रभासचा 'सालार' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. जागतिक पातळीवर या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सालारने रिलीजच्या सहा दिवसांत 450.70 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करू शकतो. 


'सालार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू, टीनू आनंद, श्रिया रेड्डी आणि ईश्वरी राव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे शाहरुखच्या 'डंकी'चं दिग्दर्शन शाहरुख खानने केलं आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी, अनिल ग्रोवर आणि विक्रम कोचर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Box Office Collection : शाहरुख अन् प्रभास गाजवतायत सिनेमागृह; 'डंकी' आणि 'Salaar'ने केली छप्परफाड कमाई