Dunki Salaar Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा '(Prabha) 'सालार' (Salaar) आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. रिलीजआधीपासून चर्चेत असणारे हे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 


'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Salaar Box Office Collection)


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'सालार' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.5 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी आणि सहाव्या दिवशी 17 कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीतच रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 297.40 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Dunki Box Office Collection)


'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशी 30.7 कोटी, पाचव्या दिवशी 24.32 कोटी, सहाव्या दिवशी 11.56 कोटींची कमाई केली आहे. तर सातव्या दिवशी फक्त 9.75 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने फक्त 151.26 कोटींचा गल्ला जमवला आहे.


राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या सिनेमात शाहरुख खानसह तापसी पन्नू, बोमन ईरानी आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे 'सालार' या सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नीलने केलं आहे. प्रभाससह या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन, श्रती हासन, टीनू आनंद, श्रिया रेड्डी, ईश्वरी राव आणि जगपती बाबू रेड्डी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


सालार आणि डंकी या सिनेमांची चर्चा फक्त देशातच नव्हे तर जगभरात आहे. जागतिक पातळीवर हे दोन्ही सिनेमे धमाकेदार कामगिरी करत आहेत. डंकी हा सिनेमा लवकरच जागतिक पातळीवर 300 कोटींचा टप्पा पार करेल. तर दुसरीकडे सालारने जगभरात 428.90 कोटींचा गल्ला जमवला आहे. सालार या सिनेमाचं बजेट 270 कोटी रुपये आहे. डंकीहादेखील बिग बजेट सिनेमा आहे. 


सालार आणि डंकी या दोन्ही सिनेमांचा जॉनर आणि विषय वेगवेगळे आहेत. पण हे सिनेमे प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. सिनेमा पाहिल्यानंतर ते सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे धमाकेदार कामगिरी करत आहेत. 


संबंधित बातम्या


Box Office Collection : शाहरुखचा 'डंकी' की 'प्रभास'चा 'सालार'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा?