Hina Khan Hospitalized Health Updates : छोट्या पडद्यासह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री हिना खानला (Hina Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीचे प्रकृती खालावली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. 


हिना खान रुग्णालयात दाखल


अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी सांगत असते. अशातच आता अभिनेत्रीने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अभिनेत्री रुग्णालयात दाखल झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तसेच अभिनेत्रीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 



हिना खानने शेअर केला रुग्णालयातील फोटो (Hina Khan Shared Photo)


हिना खानवर गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री एका बेडवर बसलेली दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हातात थर्मामीटरदेखील दिसत आहे. यात टेम्परेचर 102 डिग्री दिसत आहे. 



हिना खानने रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,"तापामुळे गेल्या चार रात्री माझ्यासाठी खूपच त्रासदायक होत्या. 102-103 डिग्री ताप आहे. अशक्तपणा खूप आला आहे. माझे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण लवकरच माझ्या प्रकृतीत सुधारणा होईल. तुमचं प्रेम असंच असूद्या". 


कोण आहे हिना खान? (Who is Hina Khan)


हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालितेच्या माध्यमातून हिनाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आहे. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. अनेक वर्षे ती या मालिकेचा भाग होती. त्यानंतर अभिनेत्री सलमान खानच्या 'बिग बॉस'मध्ये दिसून आली. या कार्यक्रमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. नागिन या सीरिजचादेखील अभिनेत्री भाग आहे. विक्रम भट्टच्या 'हॅक्ड' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हटके फॅशन स्टाईलमुळे अनेकदा अभिनेत्री चर्चेत असते. 






संबंधित बातम्या


Top TV Actress : 'या' 9 टीव्ही सुंदरींनी नुसतं रडून सिरियलला टीआरपी आणला; निर्मात्यांना सुद्धा पडली भुरळ