Shah Rukh Khan Disrespects Ram Charan : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगच्या शाही सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोहळ्यात हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने परफॉर्मन्स सादर केला होता. त्याशिवाय, बॉलिवूड आणि इतर सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. या प्री-वेडिंग कार्यक्रमामधील एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने (Shah Rukh Khan) दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा अपमान केला असल्याची चर्चा धरू लागली आहे. स्टेजवर बोलवताना शाहरुखने राम चरणचा (Ram Charan) उल्लेख इडली असा केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडू लागली आहे. 


राम चरणची मेकअप आर्टिस्ट जेबा हसन हिने  आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शाहरुखच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुखने राम चरणला स्टेजवर बोलवताना बेंड, इडली वडा राम चरण कहाँ है तू असे विचारले. राम चरण सारख्या स्टारबद्दल इतके अपमानास्पद!अशी पोस्ट जेबाने आपल्या इन्टा स्टोरीमध्ये लिहिली. 




शाहरुखने काय म्हटले?


शाहरुख खान एका परफॉर्मन्स दरम्यान राम चरणसाठी विचारणा करत होता. त्यावेळी नाटू...नाटू...हे गाणं  वाजत होते. राम चरण कुठे आहेस तू... असे शाहरुख म्हणत असताना दाक्षिणात्य भाषेत काही वाक्य म्हणतो. त्याच दरम्यान तो इडली असा उल्लेख करतो. 






राम चरणच्या चाहत्यांचा संताप


अनेक युजर्सने ट्वीटरवर शाहरुख खानवर टीका केली. एका युजरने म्हटले की, एका दक्षिण भारतीय दिग्दर्शकाने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट दिला आणि शाहरुख खान राम चरण इडली म्हणत दक्षिण भारतीयांशी वर्णद्वेषी वागतो आहे. तर एकाने म्हटले की, 'शाहरुख खान दक्षिणेतील राम चरणला इडली म्हणत त्याच्याशी वर्णद्वेषी वागत आहे.  











जेबा हसने दाक्षिणात्य स्टार्सच्या मानधनावर उपस्थित केला सवाल 


झेबा हसनने पुढे तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यामध्ये दक्षिणेकडील कलाकारांचे कौतुक किंवा आदर कसा केला जात नाही, त्यांच्याबद्दल दुजाभाव केला असल्याकडे बोट दाखवले. जेबाने म्हटले की,'हे विचित्र आहे की प्रत्येकजण आम्हाला कमी पैसे देऊ इच्छितो कारण आम्ही दक्षिण भारतातील आहोत. जर अभिनेता दिल्ली किंवा मुंबईचा असेल तर त्याच गोष्टीसाठी अभिनेत्याला तिप्पट रक्कम दिली जात असल्याकडे जेबाने लक्ष वेधले.